Tiranga Times Maharastra
सबसे कातील नृत्यांगना गौतमी पाटील आपल्या भन्नाट डान्समुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महाराष्ट्रभर तरुणांना वेड लावणारी गौतमी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेली गौतमी पाटील आता पुन्हा आपल्या डान्स व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. तिचा सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून चाहत्यांसह अनेक डान्सरही थक्क झाले आहेत.
या व्हिडीओमध्ये गौतमीने बॉलिवूडमधील प्रसिद्ध गाण्यावर जबरदस्त डान्स सादर केला असून तिच्या हटके आणि वेगवान स्टेप्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे व्हिडीओच्या शेवटी असलेली स्टेप भल्या भल्या प्रोफेशनल डान्सरनाही सहज जमणार नाही, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून दिली जात आहे.
गौतमी पाटीलच्या एक्सप्रेशन्स, एनर्जी आणि स्टेज प्रेझेन्सने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले असून अनेकांनी तिच्या या डान्सचं भरभरून कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओवर लाखो व्ह्यूज आणि हजारो कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
